आरोग्य व शिक्षणदेश विदेशसामाजिक

लोकसंख्या घटली, शाळांच्या प्रवेशांवर परिणाम, 15 हजार शाळा पडल्या बंद

चीनमध्ये जन्मदर घसल्याचा कारण तज्ज्ञ चीनचे धोरण असल्याचे सांगत आहे. चीन अनेक दशकांपासून एक मूल हे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे मुलांची संख्या कमी झाली. 2016 मध्ये चीनने एक मूल धोरण बंद केले. आता तीन मुलांची परवानगी चीन सरकार देत आहे.

भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे आणि युवकांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांनी 16 मुले जन्माला घालण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. आता चीनमधील घसरलेल्या लोकसंख्येमुळे चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. चीनमध्ये लोकसंख्या घसरल्यामुळे प्ले स्कूल बंद होऊ लागल्या आहेत. हजारोंच्या संख्येने प्ले स्कूल बंद झाल्या आहेत. चीनमध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्ले स्कूलमधील प्रवेश घसरले आहे.

चीनमधील शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये प्ले स्कूलची संख्या 14 हजार 808 ने कमी झाली आहे. प्ले स्कूलमध्ये 53 लाख मुले कमी झाली आहेत. 11.55 टक्के घसरण ही झाली आहे. प्ले स्कूलमधील कमी झालेल्या संख्येचा परिणाम प्राथमिक विद्यालयांमध्ये दिसत आहे. प्राथमिक विद्यालयांमध्ये 2023 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 3.8 टक्के कमी झाली आहे.

चीनमध्ये मुलांचा जन्मदर खालवला आहे. यामुळे मुलांच्या शाळा प्रवेशावर परिणाम झाला आहे. चीनमध्ये मुलांची कमी झालेली संख्या हे चीनमध्ये मोठे आव्हान आहे. 2023 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या घसरली आहे. ही लोकसंख्या घसरुन 1.4 अब्ज झाली आहे. 2023 मध्ये वर्षभरात केवळ 90 मिलियन मुले जन्माला आले. चीनमध्ये 1949 मध्ये मुलांच्या जन्माचे रिकॉर्ड ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही संख्या सर्वात कमी आहे.

चीन सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे देशात जन्मदर कमी झाला आहे तर दुसरीकडे वृद्धांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये 30 कोटी लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. 2035 पर्यंत ही संख्या 40 कोटी होणार आहे. 2050 मध्ये 50 कोटी वृद्ध चीनमध्ये असणार आहेत. त्याचा मोठा फटका चीनला बसणार आहे.

चीनमध्ये जन्मदर घसल्याचा कारण तज्ज्ञ चीनचे धोरण असल्याचे सांगत आहे. चीन अनेक दशकांपासून एक मूल हे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे मुलांची संख्या कमी झाली. 2016 मध्ये चीनने एक मूल धोरण बंद केले. आता तीन मुलांची परवानगी चीन सरकार देत आहे. त्यानंतरही चीनमधील युवा दाम्पत्य मुले जन्माला घालण्यास घाबरत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.