ताज्या घडामोडी

प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ : पालकमंत्री एडवोकेट आकाश दादा फुंडकर जिल्ह्यात २७ ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण

AB7

 

प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ : पालकमंत्री एडवोकेट आकाश दादा फुंडकर जिल्ह्यात २७ ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण

 

अकोला : पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र, तसेच २१ हजार ६२७लाभायींना पहिल्या हप्ता मिळाला आहे. अ‌द्यापही ज्यांना घर नाही अशा जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेतून हक्काचे घर मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट आकाश दादा फुंडकर यांनी दिली.राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण, १०लाख व्यक्तींना पहिला हप्ता वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात झाले. पालकमंत्री एडवोकेट फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय’गृहोत्सव’ कार्यक्रमात -जिल्ह्यातील  लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मंजुरीपत्र वितरण झाले. सिव्हील लाईन येथील जि. प. संविधान सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार अनुप, धोत्रे जी.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, विकास उपायुक्त राजीव फडके, जिल्हा ग्रामीण आवास योजनेचे प्रकल्प संचालक मनोज जाचव यांच्यासह अनेक अधिकारी व जिल्ह्यातील लाभार्थी बांधव उपस्थित होते. राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले.

एडवोकेट फुंडकर म्हणाले, गरीबांच्या आयुष्यात घराची संधी एकदाच येते. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. लाभार्थ्यांचे घर पूर्ण होण्यासाठी त्याला फोटो अपलोड करण्यापासून सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन केले पाहिजे. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून वेळोवेळी भेटी व टप्पेनिहाय आढावा घेतला जावा. योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती द्यावी जेणेकरून आवश्यक तरतुदी पूर्ण होऊन काम पुढे जाईल व गरीबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. जिल्हा परिषद प्रशासनाने कमी वेळामध्ये घरकुल मंजुरीचे केलेले काम हे कौतुकास्पद आहे. राज्यात २० लाख व्यक्तींना एकाचवेळी घरकुल मंजुरीपत्र मिळत असून, हा दिवस ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले.खासदार धोत्रे म्हणाले, स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्याची संधी योजनेमुळे मिळाली आहे. ही योजना अधिकाधिक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. श्रीमती वैष्णवी यांनी योजनेत पूर्ण झालेल्या व प्रगतीतील कामांची माहिती दिली. श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. तालुकास्तरावर पंचायत समिती सभागृहात आमदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, तसेच ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम झाले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.