आपला जिल्हा

महिलेने मुलीला नेले पळवून; अपहरणाचा गुन्हा केला दाखल ११ वर्षीय मुलगा व १७वर्षीय मुलगी बेपत्ता

AB7

महिलेने मुलीला नेले पळवून; अपहरणाचा गुन्हा केला दाखल

अकोलाअकराव्या वर्गात शिकत असलेल्या १६ वर्षीय मुलीला ओळखीच्याच एका महिलेने पळवून नेल्याची घटना खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. खदान पोलिसांनी एका महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.कौलखेड परिसरात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील अकरावीत शिकणारी मुलगी २० फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता शिकवणी वर्गासाठी गेली होती. १२.३० वाजता घरी येणे अपेक्षित असताना ती आली नसल्याने तिच्या आईने शिकवणी वर्गात जावून शिक्षकाला विचारपूस केली असता त्यानेमुलगी शिकवणीलाच आली नसल्याचे सांगितले. उर्वरित.

त्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली.. तिने मुलीच्या मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली पण मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर कौलखेड परिसरात आरोपी महिलेच्या पतीने पीडित मुलीच्या आईला सांगितले की तुमची मुलगी माझ्या पत्नीसोबत गेली – आहे व माझ्या पत्नीवर मलाही भरवसा नाही. त्यानंतर रात्री आठ ● वाजता पीडित मुलीचा एका – अनोळखी फोन नंबरहून तिच्या न आईला कॉल आला व मी अंजली दीदी सोबत आहे माझा शोध घेऊ न नका, असे म्हणून फोन कट केला. अशा तक्रारीवरुन खदान पोलिस ठाण्यात अंजली दिदी नामक महिलेविरुद्ध बीएनएस १३७, (२) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

११ वर्षीय मुलगा व १७वर्षीय मुलगी बेपत्ता

सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहाव्या वर्गात शिकणारा मुलगा १७ फेब्रुवारी रोजी शाळेला गेला परत तो आलाच नाही. त्याचे कुणीतरी अपहरण केले असावे अशी तक्रार मुलाच्या आजीने दिली होती. तर १७वर्षीय मुलगीसुद्धा १७ फेब्रुवारी रोजी टायपिंगच्या क्लासला गेली असता ती परत आली नाही, दोन्ही घटनांमध्ये सिव्हिल लाइन पोलिसांनी बीएनएसचे कलम १३७ (२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.