महामार्गावर हेल्मेट वापरण्याबाबत अनास्था जीवघेणीमहामार्गावरील वाढते अपघात अत्यंत चिंताजनक, अकोल्यात वाहन चालवणे झाले जिकरीचे !
AB7
महामार्गावर हेल्मेट वापरण्याबाबत अनास्था जीवघेणीमहामार्गावरील वाढते अपघात अत्यंत चिंताजनक, अकोल्यात वाहन चालवणे झाले जिकरीचे
अकोला :महामागीवरील अपघातातील मृत्यूला दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे हे न प्रमुख कारण असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वतः सोबतच कुटुंबाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर हितावह आहे.आपल्या कडील रस्ते आता चौपदरी झाले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला. दुचाकीस्वार सुसाट वेगाने गाड्या चालवतात. परंतु सुरक्षेचा विचार होत नाही. महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट घातले असेल तर डोक्याला इजाहोण्याची शक्यता कमी राहते. आणि अपघातात मृत्यू होण्याचे मुख्य कारण डोक्याला झालेली गंभीर इजा हेच असते. दोन दिवसांपूर्वी अकोल्यातीलमलकापूर भागातील एका व्यक्तीचा महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. अनेकांना हेल्मेट शिवाय वाहन चालवल्याने प्राण गमवावे लागत आहेत.खरेतर अकोला सारख्या शहरात देखील वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. मुख्य चौकात कोण कोठून येईल अंदाज येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे आवश्यक झाले आहे. अकोला शहरात हेल्मेट वापराबाबत पोलीस प्रशासन आग्रही होते. परंतु पुन्हा ढिलाई दिसते. काही चौकात कारवाई होते तर अन्य ठिकाणी तसेच जाऊ दिले जाते. कारवाई मध्ये एकसूत्रता नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालून वाहन चालवणे केव्हाही चांगले. यासाठी नियम घालून दिलेच पाहिजे