अकोला स्थानिक लोकमान्य नगर बाळापूर रोड येथील आई तुळजाभवानी गोंधळी समाज सभागृह दिनांक 19/1/2025 रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व गोंधळी समाजातील महिला पुरुष यांच्या महा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये समाजातील तळागाळातील समाज बांधवांचा सर्वानुमते विकास व्हावा या हेतूने आयोजित बैठकीमध्ये विशेष चर्चा केल्या जाईल व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता गोंधळी समाजाची संघटना सुद्धा तयार करणार येणार आहे मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये गोंधळी समाज हा भरपूर असल्याने समाजाचे खंबीर संघटीकरण व समाजाच्या विकास कामाकडे कामाला वेग मिळावा याकरिता नवीन संघटनेची आवश्यकता असल्याने सदर बैठकी चे आयोजन केल्याने गोंधळी समाजात मोठा उत्साह आज दिसून आलेला आहे या बैठकीत हजर राहण्याकरिता समाजाचे समाज कार्यकर्ते समाज बांधवाच्या घरोघरी जाऊन बैठकीचे निमंत्रण देत आहे.
या बैठकीत हजर राहण्याचे आवाहन सर्वश्री योगेश पुंडलिकराव गीते श्रीराम पचांगे दीपक अलोट गोपाल मुदगल अमोल गीते राजेंद्र गाडगे राजेश बोटे महादेव दुतोंडे राजेश पेंढारी प्रकाश पुंडलिकराव भागवत मधुकर भिकुजी सोनारन संजय सिन्हा प्रभाकर पाचपोर एडवोकेट महादेवराव नवर केले यांनी सर्व समाज बंधू भगिनींना बैठकीत हजर राहण्याचे आवाहन केलेले आहे
आज दिनांक 18/1/2025 रोजी सकाळी नऊ वाजता Akola B7 न्यूज पोर्टलवर सदर बातमी प्रसिद्ध झाल्यावर हजारोच्या संख्येने बातमी लाईक करून समाज कार्यकर्ते योग्य काम करीत असल्याचे मेसेज वरून गोंधळी समाजाच्या बंधू-भगिनीमध्ये मोठा उत्साह दिसून आलेला आहे