ताज्या घडामोडी

अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर

ॲड. आकाश फुंडकर अकोल्याचे नवे पालकमंत्री*, 

अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर

 

ॲड. आकाश फुंडकर अकोल्याचे नवे पालकमंत्री

 

अकोला: महाराष्ट्रात काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले होते. अशातच आज शनिवार 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. ॲड. आकाश फुंडकर हे अकोल्याचे नवे पालकमंत्री असणार आहे. ॲड. आकाश फुंडकर हे लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचे सुपुत्र आहेत. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पश्चिम विदर्भातील तीन जिल्हयामधे हसन मुश्रीफ यांना वाशिम, आकाश फुंडकर अकोल्याचे पालकमंत्री तर मकरंद जाधव पाटील हे बुलढाणाचे पालकमंत्री असणार आहेत.वाचा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी*गडचिरोली – देवेंद्र फडणवीसनागपूर – चंद्रशेखर बावनकुळेठाणे – एकनाथ शिंदेपुणे – अजित पवारबीड – अजित पवारसिंधुदुर्ग- नितेश राणेअमरावती – चंद्रशेखर बावनकुळेअहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटीलवाशिम – हसन मुश्रीफसांगली – चंद्रकांत पाटीलसातारा -शंभुराजे देसाईछत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाटजळगाव – गुलाबराव पाटीलयवतमाळ – संजय राठोडकोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळअकोला – आकाश फुंडकरभंडारा – संजय सावकारेबुलढाणा – मकरंद जाधवचंद्रपूर – अशोक ऊईकेधाराशीव – प्रताप सरनाईकधुळे – जयकुमार रावलगोंदिया – बाबासाहेब पाटीलहिंगोली – नरहरी झिरवळलातूर – शिवेंद्रसिंग भोसलेमुंबई शहर – एकनाथ शिंदेमुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढानांदेड – अतुल सावेनंदुरबार – माणिकराव कोकाटेनाशिक – गिरीष महाजनपालघर – गणेश नाईकपरभणी – मेघना बोर्डीकररायगड – अदिती तटकरेसिंधुदुर्ग- नितेश राणेरत्नागिरी – उदय सामंतसोलापूर – जयकुमार गोरेवर्धा – पंकज भोयरजालना – पंकजा मुंडेअकोला – ॲड आकाश फुंडकर

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.