ताज्या घडामोडीदेश विदेश

इस्त्रायलने इराणची कंबरच तोडली, वाळूच्या खाली असलेली क्षेपणास्त्र फॅक्टरी इस्त्रायलकडून उद्ध्वस्त

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे क्षेपणास्त्र तज्ज्ञ फॅबियन हिन्झ म्हणतात, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु किती नुकसान झाले, त्याचा अंदाज लावणे अवघड आहे.

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष ऑक्टोबर महिन्यात कमालीचा वाढला होता. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलावर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलने जबरदस्त पलटवार केला. त्यात इराणची महत्वाची लष्करी केंद्र उद्ध्वस्त झाली. आता इस्त्रायलने केलेल्या जबरदस्त हल्ल्याची एक, एक माहिती समोर येत आहे. या हल्यात इराणमधील सेमनान प्रांतात असलेले शाहरौद स्पेस सेंटर उद्धवस्त झाले आहे. या ठिकाणावरुन इस्त्रायलवर इराणने क्षेपणास्त्र डागले होते. आता हा बेसच इस्त्रायलने संपवला आहे.

इस्रायली हल्ल्याच्या अगदी आधी इराणकडे इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतात इस्त्रायल हल्ला करणार असल्याची माहिती होती. परंतु इस्रायलने सेमनान भागात जाऊन त्यांचे क्षेपणास्त्र तळ आणि स्पेस सेंटरला लक्ष्य केले. त्याची कल्पना इराणला नव्हती. या हल्ल्यात इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे 80 टक्के घन इंधन नष्ट झाले आहे. त्यामुळे इराण पूर्वीसारखा हल्ला आता करु शकणार नाही. तसेच या केंद्राचे संरक्षण करणारी हवाई संरक्षण यंत्रणाही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झाली.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे तज्ज्ञ फॅबियन हिन्झ म्हणतात, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु किती नुकसान झाले, त्याचा अंदाज लावणे अवघड आहे. शाहरौद बेस तेहरानपासून 370 किलोमीटर लांब उत्तर-पूर्व भागात आहे. त्याच ठिकाणी इमाम खमैनी स्पेस सेंटरसुद्धा आहे. या केंद्राची सर्वात मोठी इमारत इस्त्रायल हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहे. तसेच परचिन मिलिट्री कॉम्प्लेक्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.