आपला जिल्हा

सरस्वती शाळेतील अनेक शिक्षक संशयाच्या भोवऱ्यातमुलगा आ. भारसाकळे यांचा निकटवर्तीय असल्याचा फायदा

AB7

शिक्षिका वर्षा गावंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 

सरस्वती शाळेतील अनेक शिक्षक संशयाच्या भोवऱ्यातमुलगा आ. भारसाकळे यांचा निकटवर्तीय असल्याचा फायदा

 

अकोट सरस्वती शाळेतील अनेक गंभीर प्रकार मागील काळात चव्हाट्यावर आले आहेत त्याचप्रमाणे आणखी एक शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणारा प्रकार समोर आला आहे विद्यालयातील शिक्षिका वर्षा विनायक गावंडे ह्या २००२ पासून डीएड शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत यादरम्यान वर्षा गावंडे यांनी २०१४-१५ मध्ये श्रीमती सावित्रीबाई फुले बीएड कॉलेज अकोट येथून नियमित बीएड केल्याचे निदर्शनास आले आहे एवढ्यावरच न थांबता बीएड प्रशिक्षण पूर्ण झाल्याने तात्काळ पदोन्नती घेऊन मुख्याध्यापक

 

व शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने वेतनश्रेणी सुद्धा लागू करून घेतली दोन वर्ष नियमित बीएड करून त्याच काळात शाळेत कर्तव्यावर सुद्धा गावंडे हजर होत्या बीएड काळातील वेतन वर्षा गावंडे यांनी शासनाची दिशाभूल करून घेतलेले आहे वर्षा गावंडे यांनी अशा प्रकारची शासनाची फसवणूक करीत मागील पाच ते सहा वर्षांपासून बीएड श्रेणीचे घेतलेले वेतन

 

वसूल करून फसवणुकीचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकत्यनि शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षणसंचालक, शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केली आहे अशा चुकीच्या खोट्या कागदपत्रांवर अप्रुव्हल कसे मिळाले हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे अप्रुव्हल

 

अशा चुकीच्या शिक्षकांमुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे अशा गंभीर प्रकारामुळे पालकांचा विश्वास आमच्या शाळेवर कमी झाला आहे या फसवणूक करणाऱ्या दोन-तीन शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षकांची बदनामी व मानहानी होत आहे अशा शिक्षकांवर कठोर कार्यवाही करून आमच्या शाळेचे नावलौकिक कायम राहावे

 

शिक्षक/शिक्षिका सरस्वती विद्यालय अकोट

 

मिळवण्याकरिता शिक्षणाधिकारी यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप नमूद तक्रारीत केला आहे हा सर्व प्रकार शाळेचे अध्यक्ष मोहन आसरकर यांच्या कार्यकाळात झालेला आहे त्यामुळे आसरकर सुद्धा या फसवणुकीमध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे तसेच हे प्रकरण आजपर्यंत वर्षा गावंडे यांचे पती कुटासा येथील शिवाजी शाळेचे

 

मुख्याध्यापक संतोष चरपे यांच्या वजनाखाली दबल्याचे चित्र आहे तसेच मुलगा हा आ. प्रकाश भारसाकळे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे या प्रकरणात कुणीही आज पर्यंत हात घातला नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे परंतु या माध्यमातून अनेक शिक्षकांचा भांडाफोड भविष्यात होणार असून शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित ?

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.