महिला सरपंचाकडून उपसरपंचाच्या श्रीमुखात
पारनेर : तालुक्यातीलराजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कान्हूरपठार येथे महिला सरपंचाने उपसरपंचाच्या श्रीमुखात मारल्याने गावात बुधवारी (दि. ५) तणावाचे वातावरण झाले. ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काही तास गावात बंद पाळला. कान्हूरपठार येथे उपसरपंच प्रसाद नवले यांच्याकडून अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या सरपंच संध्या ठुबे यांनी भर मासिक सभेत उपसरपंच नवले यांच्या कानशिलात मारली. या प्रकाराने सर्व सदस्य अवाक् झाले. ‘कोणतेही कारण नसताना या पूर्वीही वारंवार अपमानास्पद शब्दप्रयोग नवुले यांनी केले. एकापाणीटंचाई, टैंकर प्रस्ताव, पथदिवे बिल, दारूबंदी, बोगस बिले व एक वर्षभर जो अनागोंदी खर्च केला. त्याचा तपशील द्या, तसेच दारूबंदी या विषयावर विशेष ग्रामसभा लावा, याची विचारपूस ग्रामसेवकाला करीत असताना सरपंच ठुबे यांनी बोगस बिल काढल्याचे उघड केले. त्याचा राग आल्याने त्यांनी माझ्यावर हल्ला केला. परंतु महिलेचा आदर करीत आम्ही शांतता राखली. -चेकप्रसाद नवले, उपसरपंचसरपंचमहिलेसोबत कसे बोलावे, याचे भान त्यांना नाही. महिलेचा अवमान आणिउपसरपंच नवले यांनी ग्रामपंचायतीचे बुक चोरून नेले. त्यांनी १५ हजारांचा मुरूम टाकला असताना ७५ हजार रुपयांचे बिल काढा, असे ग्रामसेवकास सांगितले. तसे न केल्यामुळे सरपंच, ग्रामसेवकाचा बनावट शिवका बनवून बिल काढण्याचा प्रकार नवले यांनी केला. ‘महिला सरपंच आहे, तिने घरचा कारभार करावा, गावचा कारभार करण्यास मी सक्षम आहे. माझ्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत चालेल,’ असे त्यांनी अनेक वेळा मला हिणवले. ग्रामसेवकास अरेरावीची भाषा वापरली.अपमान करण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी तेच केले. मीत्यांना समजावून सांगूनही त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे माझा संयम सुटला,’ असे सरपंच ठुबे यांनी सांगितले. उपसरपंच प्रसाद नवले म्हणाले, की आपण अपमानास्पद कोणतेही शब्द वापरले नाहीत. फॉर्म १२ आणि तत्सम बाबींबाबत माहिती घेत असताना त्यांनी माझ्या कानशिलात मारली. त्यांचे वर्तन योग्य नाही.