आपला जिल्हा

अकोला महानगर पालिकेतील विविध समस्यांसाठी महानगर पालीकेवर अकोला शहर काँग्रेस कमिटीचा धडक मोर्चा व धरणे आंदोलन

AB7

अकोला महानगर पालिकेतील विविध समस्यांसाठी महानगर पालीकेवर अकोला शहर काँग्रेस कमिटीचा धडक मोर्चा व धरणे आंदोलन


 

अकोला स्थानिक भष्टाचाराने बरबटलेल्या अकोला महानगरपालिकेतील जनता समस्याने त्रस्त झाली असुन विविध समस्यों संदर्भात अकोला शहर काँग्रेस कमिटी तर्फे महापालिका समोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनामध्ये.  मोठ्या संख्येने काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनांमध्ये कार्यकर्ते सह शहरातील सर्वसाधारण जनता ही या आंदोलनात सामील झाली होतीअकोला महानगरातील विविध समस्या खालील प्रमाणे आहे.

 

१) महानगरातील लोकांवर लादलेल्या अवाजवी टॅक्स मध्ये कपात करणे तसेच थकित टॅक्स वर लावण्यात येत असलेला शास्ती (ब्याज) नियम रद्द करणे.

 

२) पाणी पट्टी कमी करून दररोज पाणी पुरवठा करणे.

३) गुंडेवारी जागा नियमाकुल करण्याची मुदत वाढवुन देणे तसेच नियमाकुल करते वेळी लागणारी प्रक्रिया सुलभ करणे तसेच त्याचे शुल्क भरणाऱ्याला टप्पे पाडुन देणे.

४) ज्याची जागा गुंडेवारी आहे आणी ज्यांना घरकुल मंजुर झाले आहे त्यांना त्याच जागेवर घरकुल मंजुर करणे.

५) घरकुल योजनेतील महत्वाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील चेक त्वरीत देणे.

६) मनपा कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोगानुसार पगारवाढ करणे.

७) अमृत-२ योजने मधील कामे रखडली आहेत ती पुर्णत्वास नेणे.

८) सफाई कामगारांच्या घरांचे पट्टे नियमाकुल करणे.

९) मनपा प्रशासनने भेदभाव न करता फक्त सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातील विकास कामांना मंजुरी न देता सर्व प्रभागात समान निधी मंजुर करणे.

१०) अकोला महानगरात रमाई योजना सुरु करणे.

११) पंतप्रधान आवास योजनेतील अटी व शर्ती शिथिल करणे.

१२) जनता बाजारेतील रस्ते अद्यावत करणे तसेच तिथे नियमीत साफ सफाई करणे.

१३) नगर रचना विभागात फोफावलेले भ्रष्टाचार संपवणे.

१४) जन्म-मृत्यु विभागा मधील भ्रष्टाचाराला आळा घालणे. शहरामध्ये स्वच्छता गृह उभारणे. या सर्व बाबींच्या करिता आज रोजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर अकोला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धडक मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाश भाऊ तायडे निकलेस दिवेकर महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे नगरसेवक इरफान भाई मोंटू भाई आकाश भाऊ कवडे प्रशांत प्रधान व इतर शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत सदरचे वृत्तलेपर्यंत आंदोलन हे सुरूच आहे

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.