राजकीय

मुख्यमंत्री कोण होणार? शिवसेनेतील बड्या नेत्याने घेतले हे नाव

निकालानंतर महायुतीचे नेते एकत्रित बसून ठरवणार आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे. सध्या आलेला एक्झिट पोल हा सर्वे आहे. अजून 23 तारखेचा निकाल लागू द्या. परंतु आम्हा सर्वांना आणि राज्यातील सामान्य नागरिकांना वाटते शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहे. त्यापूर्वी आलेल्या एक्झिटपोलमध्ये राज्याच्या सत्तेची सूत्र महायुतीकडे जाणार असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीला आपली सत्ता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य येत आहे. आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत माहिती दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, निकालानंतर महायुतीचे  नेते एकत्रित बसून ठरवणार आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे. सध्या आलेला एक्झिट पोल हा सर्वे आहे. अजून 23 तारखेचा निकाल लागू द्या. परंतु आम्हा सर्वांना आणि राज्यातील सामान्य नागरिकांना वाटते शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी 2-4 अपक्षांची आवश्यकता पडली तर आम्ही त्यांची मदत घेऊ. परंतु आम्हाला इतरांची मदतीची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले

नेते सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ते 22 तारखेलाही सरकार स्थापन करू शकतात. २३ नंतर आमचे सरकार स्थापन झाल्यावर ते सिल्वर ओकवर प्रतीसरकार स्थापन करतील. तसेच आता जे काही बाकीचे राहिलेले आहेत त्यांनी हिमालयात जायचे आहे.

महायुतीची सत्ता येणारच

महायुतीची सत्ता तर 100% येणार आहे. त्याबद्दल काही वाद नाही. परंतु एक रिस्क नको म्हणून एखाद्याचे मन दुखवू नये म्हणून सर्वच अपक्षांच्या संपर्कात आम्ही असतो. आता अडीच वर्षात जी कामे करू शकलो नाही, ती येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात करून दाखवू. भंकसगिरी करण्यात आम्ही वेळ घालवणार नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, एखाद्या सभेमध्ये सांगायचे की आम्ही अडीच वर्षात हे काम केले, ते काम केले. कोरोनाचा गुणगान गायले जाते. त्या काळात घरातच बसले आणि म्हणतात आम्ही काम केले.

.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.