वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार का? अकोला शहरात वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून नवीन बस स्थानकासमोर झिंगरा चौकात ऑटो रांगेत उभे करण्यासाठी सिमेंटचे बॅरिकेट्स बसवण्यात आले आहेत मात्र काही आटो चालक प्रवासी मिळवण्यासाठी रस्त्यावरच वाहने उभी करत असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना आणि इतर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेने याकडे तातडीने लक्ष देण्याचे गरज आहे