ताज्या घडामोडी

ऑपरेशन सिंदूर समर्थनात मुस्लिम समाजाकडून जल्लोष”हिंदुस्तान जिंदाबाद”च्या घोषणा : कच्छी मशिदीसमोर फटाक्यांची आतिषबाजी 

AB7

ऑपरेशन सिंदूर समर्थनात मुस्लिम समाजाकडून जल्लोष”हिंदुस्तान जिंदाबाद”च्या घोषणा : कच्छी मशिदीसमोर फटाक्यांची आतिषबाजी 

 

अकोला : भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या निर्णायक कारवाईची बातमी समजताच अकोल्यामध्ये देशभक्तीची आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली. मोहम्मद अली चौक, कच्छी मस्जिदसमोर मुस्लिम समाजाने देशप्रेम आणि लष्कराच्या समर्थनात मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला.

लष्कराच्या या धाडसी कारवाईचे स्वागत करत सैकडो नागरिक चौकात एकत्र झाले. देशभक्तीच्या जोशात वातावरण भरून गेले होते. फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटप करण्यात आले आणि “हिंदुस्तान जिंदाबाद”, “भारतीय सेना जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

 

या कार्यक्रमाचं नेतृत्व अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आणि कच्छी मस्जिदचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी केलं. त्यांनी सांगितलं, “भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही लष्कराला सलाम करतो. आम्ही भारतीय आहोत आणि आमच्या देशाच्या सोबत सदैव उभे आहोत.”

 

कच्छी मस्जिदसमोर तिरंगा फडकावण्यात आला आणि तरुणांनी देशभक्तीचा जोश प्रकट केला. सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी विशेष दुआही करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी मरकज़ी अहले सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी मुदाम साहेब, सलीम खान, नदीम कपूर, कच्छी मस्जिदचे मुतवल्ली एजाज सूर्या, नायब मुतवल्ली हाजी यासीन बच्चव, हनीफ मलक, सोहेल खान, नईम फराज, मोसिन ठेकेदार, लाला पठाण, यासीन कपडिया, समीर भूरानी, माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, गुड्डू पठाण, मेहमूद पठाण, शेख नदीम, मोंटू भाई उर्फ मोईन खान  जावेद खान, तनवीर खान, जिशान खान, सुफ़यान डोकडिया, फैजान खान, वजिद चव्हाण, यासीन चव्हाण, इरशाद खान, रफिक जकारिया, खालिक साहेब, असलम गाजी, अंसार नवाब, शेख जाहिर, शेख रियाज आणि सैयद सफदर अली यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.