पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
वृत्तसंस्था नवी दिल्लीः पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. काल भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यामुळे दिल्लीत हालचालिंना वेग आला आहे, या बैठकीआधी पीएम मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली.पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हेही बैठकीला पोहोचले. बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अङ्कयांवर हवाई हल्ले केले. बैठक सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितरक्सौल सीमेवर चिनी नागरिकांना अटकऑपरेशन सिंदूरनंतर, भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट आहे. सुरक्षा दल कडक पहारा देत आहेत. बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल सीमेवर ४ चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ते बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे व्हिसा नव्हता. सशस्त्र सीमा दलाने त्यांना अटक केली.कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ स्फोटगुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळील गुजर खावडा परिसरात आज सकाळी स्फोट झाला. मिळालेल्यां माहितीनुसार, एक उडणारी संशयास्पद वस्तू हाय टेन्शन पॉवर लाईनला धडकली, ज्यामुळे हा स्फोट झाला. ही घटना सकाळी ६ वाजताच्या पहली भजच्या दुर्गम गाव कोटडाभेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मोदी सरकार दहशतवादावर मोठा हल्ला करणार असल्याचे मानले जात आहे.दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे आवश्यकमोदी सरकार आणि लष्कर पुन्हा हवाई हल्ले करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या हवाई हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्य इतर ठिकाणीही हल्ला करू शकते. काश्मीरमधून राजस्थानची १०३७ किमी लांबीची सीमा सीलऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या गावांमध्ये सैन्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राजस्थानची संपूर्ण १०३७ किमी लांबीची सीमा सील करण्यात आली आहे. जमिनीवर बीएसएफ आणि आकाशात हवाई दल सतर्क आहे. पश्चिम सेक्टरमधील सर्व हवाई तळांवर हाय अलर्ट आहे. येथून दिवसरात्र लढाऊ गस्त घातली जात आहे. दुसरीकडे, बीएसएफने जमिनीवर गस्त वाढवली आहे. यासाठी अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. बिकानेर, किशनगड (अजमेर) आणि जोधपूर विमानतळांवरील सर्व उड्डाणे १० मे पर्यंत थांबवण्यात आली आहेत. आज (गुरुवार) जयपूर विमानतळावरून ४ उड्डाणे रद्द करण्यात आली