पावसाळा सुरु झाल्यावर रस्त्याचे काम करणार कान्यू तापडिया नगरातील नागरिकांचा रेल्वे प्रशासनाला सवाल
AB7
पावसाळा सुरु झाल्यावर रस्त्याचे काम करणार कान्यू तापडिया नगरातील नागरिकांचा रेल्वे प्रशासनाला सवाल
अकोला: रेल्वे कडून बिलीरेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. त्यामुळे न्यू तापडियानगर आणि लगतच्या भागातील दुचाकी स्वारांच्या सोयीसाठी तात्पुरता रस्ता तयार करून दिला आहे. परंतु ही वाट खाचखळग्यांनी भरलेली आहे. हा रस्ता पावसाळ्यापूर्वी ठीक करण्यात यावा जेणेकरून लोकांना ये जा करताना त्रास होणार नाही. परंतु मे महिना लागला तरी रस्त्याच्या कामाबाबत काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातकामाला सुरुवात करणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.समाजसेवक निलेश देव यांनीमध्यंतरी रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन तात्पुरता रस्ता व्यवस्थित करून देण्याविषयीनिवेदन दिले होते. त्यावेळी अधिका-यांनी देखील पावसाळ्यापूर्वी काम करण्याचेआश्वासन दिले होते. मात्र अद्याप काहीही प्रगती दिसत नाही. कारण हा रस्ता पुढे पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.उड्डाणपुलाच्या कामाची गती पाहता तसेच निधी उपलब्धता आणि अडचणी पाहता किती वेळ लागेल सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल याकडे देखील रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांची सोय पाहावी अशी मागणी केली जात आहे.