ताज्या घडामोडी

मालेगाव औद्योगिनी महोत्सव 2025 चे भव्य शुभारंभ

AB7 करिता अमोल इंगळे मालेगाव जिल्हा नाशिक

दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव औद्योगिनी महोत्सव 2025 चे भव्य शुभारंभ

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिका मध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी स्वयम सहायता महिला बचत गट उत्पादन विक्री प्रदर्शनी कार्यक्रम व मालेगाव उद्योगिनी महोत्सव 2025 चे भव्य शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते मालेगाव उद्योगिनी महोत्सव 2025 चे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार मुक्ती मोहम्मद इस्माईल आमदार मालेगाव मध्ये प्रमुख अतिथी माननीय नामदार शोभाताई बच्छाव खासदार धुळे लोकसभा मतदारसंघ तसेच आयोजक माननीय श्री रवींद्र जाधव आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्या उपस्थितीत आज मालेगाव उद्योगिनी महोत्सव 2025 चे उद्घाटन करण्यात आले यावेळी महोत्सव 2025 मध्ये जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील स्वयंसहायता महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध गृह उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शनी व विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल व हाताने तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रमाणात स्टॉल या महोत्सवामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटाचे, स्टॉल लावण्यात आलेले आहेत आज या महोत्सवाचा पहिला दिवस असतानाही आज या प्रदर्शनी मध्ये उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे हा उत्सव सतत तीन दिवस चालत असून चालणार असून अशा उत्सवातून बैला महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होईल या हेतूने महाराष्ट्र शासन पाऊल उचलत आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.