नाशिक सिंहस्थासाठी कुंभमेळा प्राधिकरणमे कुंभ ळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश
AB7, करिता अमोल इंगळे नाशिक
नाशिक सिंहस्थासाठी कुंभमेळा प्राधिकरणमे कुंभ ळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई येथे कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या बैठकीत यांनी हे आदेश दिले. नियोजन, समन्वय आणि तसेच वेगाने कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाची सूचना केली आहे. आता कुंभमेळा कायदादेखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिलेमहत्त्वाचे निर्णय१. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना शहरापर्यंत येण्यासाठी ई-बसेस२. ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणूनही साकारणार३. रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारणार४. शिडीं, छत्रपती संभाजीनगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन५. त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी येथे धार्मिक कॉरिडॉरशिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ओद्वार या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लैंडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी अलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.