राजकीय

सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाला धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे. कुडाळमधून विद्यमान खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता. आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे.

कुडाळमधून विद्यमान खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडीतून दीपक केसरकर उभे आहेत. कणकवलीतून नितेश राणे आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढतायत. निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपासोडून शिवबंधन हाती बांधलं. हे तिन्ही नेते महायुतीमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार नारायण राणे यांना या तिन्ही मतदारसंघातून मोठ मताधिक्क्य मिळालं होतं. त्यामुळे विधानसभेला महायुतीच्या या तिन्ही जागा निवडून येण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाला फार फरक पडणार नाही

माजी खासदार सुधीर सावंत यांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला तसा फार फरक पडणार नाही. कारण आतापर्यंत त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. सुधीर सावंत यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिवंगत प्रभा राव आणि प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. 2008 ला पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश करून महाराष्ट्रात काम केलं.

कोण आहेत सुधीर सावंत?

1991 ला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामावर प्रभावित होऊन काँग्रेस प्रवेश

1991 साली कोकणातील तेव्हाचा राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राहिलेल्या दिवंगत मधू दंडवते यांचा पराभव करून लोकसभेवर निवडून गेले.

लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय समितीचे सचिव म्हणून काम केलं.

1998 ला काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव म्हणून काम केलं.

2002 ला विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती. काँग्रेसची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी सांभाळली.

2005 ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षावर नाराज

2005 ते 2008 तीन वर्षे पक्षात राहून कोकणात नारायण राणेशी संघर्ष केला

2008 ला पक्षविरोधी भूमिकेमुळे पक्षातून हकालपट्टी

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.