पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित नियोजनाची मागणी – काँग्रेसने आयुक्तांना दिले निवेदन
AB7
पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित नियोजनाची मागणी – काँग्रेसने आयुक्तांना दिले निवेदन
अकोला, 17 एप्रिल 2024 – अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रसांत वानखेड़े पाटील यांनी अकोला शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित आणि नियमानुसार होण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “वर्षाचे विचार लक्षात घेता अकोला महानगरात पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित नियोजन करणे आवश्यक आहे. जर नागरिकांना योग्य व शुद्ध पाणी मिळाले नाही, तर अनेक प्रकारचे आजार पसरू शकतात.”यासोबतच निवेदनात जलस्रोतांची तपासणी करून स्वच्छता राखण्याचे आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मोहम्मद इरफान माजी नगरसेवक पराग कांबळे माजी नगरसेवक मोईन खान उर्फ मोंटू भाई अकोला युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश कवडे अकोला विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे पाटील सय्यद शहजाद व काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते