पत्नीने प्रियकराची मदत घेत पतीची केली हत्याथरार : व्हिडिओ कॉलवर दाखविला मृतदेहबुरहानपूर मध्य प्रदेशातील :
AB7
पत्नीने प्रियकराची मदत घेत पतीची केली हत्याथरार : व्हिडिओ कॉलवर दाखविला मृतदेहबुरहानपूर मध्य प्रदेशातील :
बुरहानपूरमध्ये थरारक घटना उघडकीस आली असून, यात १७ वर्षीय अल्पवयीन पत्नीने प्रियकर व त्याच्या दोन मित्रांच्या साथीने २५ वर्षीय पतीची निघृण हत्या केली. हत्येनंतर तिने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉलवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पतीचा मृतदेहही दाखवला. बुरहानपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले की, शाहपूर येथील गोल्डन पांडे ऊर्फ राहुलच्या विवाहानंतर चार महिन्यांनी हा प्रकार घडला. हे जोडपे खरेदी केल्यानंतर व एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बाइकवरून घरी परतत होते. यावेळी अल्पवयीन पत्नीने चप्पल खाली पडल्याचा बहाणा करीत पतीला दुचाकी रोखण्यास सांगितले. त्याने वाहन रोखताच तिचा प्रियकर युवराजच्या दोन मित्रांनी त्याला घेरले.तिन्ही आरोपींनी राहुलला शेतात फरफटत नेले. तेथे बिअरच्या बाटलीने त्याच्यावर ३६ वार केले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पत्नीनेही पतीवर हल्ला केला. हत्येनंतर तिने युवराज या प्रियकराला व्हिडीओ कॉल करून काम झाले, असे म्हणाली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह शेतात फेकून दिला व घटनास्थळाहून फरार झाले. चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. पतीच्या हत्येसाठी ५०,००० रुपयांत शूटर बोलावला
.