महाराष्ट्रराजकीय

लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचं सरप्राईज, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी!

पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे. डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहि‍णींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. आचारसंहिता सुरू आहे. लाडक्या बहि‍णींना आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते. आता वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे, तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यानंतर याच नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.आमचा हेतू स्पष्ट आहे, आम्ही घेणारे नाही तर देणारे लोक आहोत असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला.

पुढे बोलताना त्यांनी याच योजनेवरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. लाडक्या बहिणी यांना कधीही माफ करणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील.आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहि‍णींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.