आपला जिल्हाक्राईम स्टोरीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीसाठी टेन्शन वाढवणारी बातमी

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत. ही लॉरेन्स बिश्नोई गँग मागच्या काही काळापासून सलमान खान याला धमकावत होती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे पूर्वचे उमदेवार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. या महिन्यात 12 ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत. ही लॉरेन्स बिश्नोई गँग मागच्या काही काळापासून सलमान खान याला धमकावत होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच ठोस कारण अजून समोर आलेलं नाही. पण बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते, म्हणून त्यांना संपवण्यात आल्याच म्हटलं जातय.

शुक्रवारी सायंकाळी झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुरफान खान नावाच्या 20 वर्षाच्या तरुणाला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना महायुतीने वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वमधून शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना हरवून निवडणूक जिंकली होती.

वांद्रे पूर्व हा मातोश्रीच्या परिसरातील विधानसभा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. वरुण सरदेसाई हा आदित्य ठाकरेच्या मावशीचा मुलगा आहे. झिशान सिद्दीकी गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण काँग्रेसमध्ये ते नाखुश असल्याच काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. निधन होण्याआधी त्यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांनी तीन दशकांची काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.