सामाजिक

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिवंगत चांद खान यांच्या परीवाराची घेतली भेट

AB7

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिवंगत चांद खान यांच्या परीवाराची घेतली भेट

सबहेड – दिवंगत चांद खान यांच्या सि.के. फाउंडेशन या सामाजिक संस्थेला सरकारी मदतीकरिता कटीबद्ध

अकोला – समाजसेवक व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिवंगत चांद खान यांची पक्षामध्ये चांगली पकड होती. अकोला दौऱ्यावर आलेले भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिवंगत चांद खान यांच्या परिवाराची भेट घेवून परिवाराची सांत्वना केली. यावेळी त्यांनी सांगितले की, चांद खान गेल्या 25 वर्षापासून समाजसेवा करणारे एक चांगले युवा समाजसेवक होते. चांद खान यांनी सामाजिक दायित्व हे नियमितपणे पार पाडले. ज्याकरिता चांद खान यांनी सी. के. फाऊंडेशनची स्थापना सुद्धा केली होती.

त्यांच्या सी. के. फाऊंडेशनचे कार्य नियमितपणे सुरु राहण्याकरिता सरकारतर्फे आवश्यक त्या मदतीकरिता मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले.

यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान, नागपूर भाजपाचे रहीम भाई, श्रीराम ट्रान्सपोर्ट चे जावेद खान, लाल बंगला ट्रस्टचे अध्यक्ष जमील अहमद खान, जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलुस चे अध्यक्ष हाजी मुदाम खान, जावेद जकारिया, सलीम खान, सैय्यद बाबर, नईम भाई, युनूस खान, सोहेल खान, साजिद खान, जिशान खान, फैजान चांद खान, जमीर खान आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.