ओऽऽ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई, उद्या तुम्ही म्हणाल…’, सुळेंच्या फडणवीसांवरील टीकेवरून चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली. ईडीपासून सुटका झाली त्यामुळे भाजपसोबत केल्याचा सर्वांना आनंद आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी The Election That Surprised India पुस्तकात हा मोठा दावा केल्याचा उल्लेख आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. दरम्यान, सुळेंनी केलेल्या फडणवीसांच्या टीकेवरून चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. यावर बोलताना सुप्रिया म्हणाल्या, माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्तीकडून हे संपूर्ण देशात सुरू आहे, असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलंय. ‘ओऽऽऽऽऽ १२मतीच्या मोठ्ठ्या ताई…उद्या तुम्ही म्हणाल आर. आर. पाटील यांना सही करायला पण देवेंद्र यांनीच सांगितले. आणि हो 100 कोटींच्या वांग्याचे बियाणे अजून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले नाही.. त्याचे एकदा ऑनकॅमेरा वितरण कराल का?’ असा सवालही त्यांनी केलाय.