देश विदेश

तब्बल 47 वर्षांनी जीवंत झाले नासाने पाठवलेले व्हॉएजर-1 यान, कशासाठी पाठवले होते?

विश्वाच्या अनंत प्रवासाला निघालेले नासाच्या व्हॉएजर-1 यानाचा संपर्क तुटला होता. परंतू नासाच्या संशोधकांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्यात यश मिळविले आहे. काय आहे यान कशासाठी ते सोडले होते. साऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहा?

नासाने 47 वर्षे जुन्या व्हॉएजर-1 यानाशी थोडा काळ संपर्क तुटल्यानंतर पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यास यश मिळविले आहे. साल 1981 नंतर वापर झाला नसलेल्या एका रेडिओ ट्रान्समीटरच्या मदतीने हा संपर्क झाला आहे. कॅलिफॉर्नियातील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतील नासाच्या इंजिनिअरन्सी 24 ऑक्टोबरला अंतराळ यानाशी पुन्हा संपर्क करण्यात यश मिळविले आहे. नासाचे हे व्हॉएजर-1 यान सौर्यमालेच्याही पलिकडे 15 अब्ज मैल हूनही अधिक दूरवर अंतराळात प्रवास करीत आहे. या यानात 16 ऑक्टोबरला एक ट्रान्समीटर बंद पडल्याने संपर्क करण्यात अडथळा आला होता. हा शटडाऊन अंतराळ यानाच्या फॉल्ट प्रोटेक्शन सिस्टीमने झाला असावा असे म्हटले जात आहे. वीजेचा अधिक वापर झाल्यानंतर काही सिस्टीम ज्यात बंद होत असतात.

NASA Voyager 1 Comes Back to Life Using 1981 Tech:

16 ऑक्टोबरला पाठवला होता एक संदेश

पृथ्वीवरुन व्हॉएजर-1 यानाला एक संदेश पाठविण्यासाठी आणि तो तेथून परत येण्यासाठी सुमारे 23 तास लागतात. 16 ऑक्टोबरला नासाच्या संशोधकांनी या यानाला संदेश पाठवला. तेव्हा 18 ऑक्टोबरपर्यंत कोणताही प्रतिसाद आला नाही. एक दिवसानंतर व्हॉएजर-1 यानाशी संपूर्ण संपर्क ठप्प झाला. तपासानंतर अंतराळ एजन्सीच्या टीमला आढळले की व्हॉएजर-1च्या फॉल्ट प्रोटेक्शन सिस्टीमने अंतराळ यानाला दुसऱ्या कमी शक्तीच्या ट्रान्समीटरवर स्विच केले होते.

व्हॉएजर-1 मध्ये दोन रेडियो ट्रांसमीटर आहेत. परंतू तो अनेक वर्षापासून एकाचा वापर करीत आहे. त्याला एक्स – बॅण्ड म्हणतात. दुसरा ट्रान्समीटर एस-बॅण्ड वेगळ्या फ्रीक्वेन्सीचा वापर करतो. ज्यास साल 1981 पासून उपयोग केलेला नव्हता. सध्या नासाने एक्स – बॅण्ड ट्रान्समीटर वर पुन्हा स्विच करण्यापासून वाचण्याचा पर्याय निवडला आहे. जोपर्यंत फॉल्ट प्रोटेक्शन सिस्टम कोणी सक्रीय केले हे कळत नाही तोपर्यंत हा पर्याय वापरण्याचा निर्णय़ घेतला आहे. ज्याला अनेक आठवडे लागू शकतात.

एक्स – बॅण्ड सुरु करण्यात काही संभाव्य धोका तर नाही ना याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, नासाच्या इंजिनियरनी एस-बॅण्ड काम करीत आहे की नाही हे तपासण्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी व्हॉएजर-1 ला एक संदेश पाठविला.त्यानंतर 24 ऑक्टोबरला या संदर्भात कन्फर्मेशन मिळाले. परंतू हा पर्याय खूप काळासाठी भरोसेमंद नसल्याचे नासाचे म्हणणे आहे.

व्हॉएजर-1 ला व्हॉएजर-2 च्या नंतर 5 सप्टेंबर 1977 रोजी लाँच करण्यात आले होते. परंतू वेग जास्त असल्याने 15 डिसेंबर 1977 ला व्हॉएजर -1 ने व्हॉएजर – 2 ला मागे टाकले. हे अंतराळ यान सौर्य मालिकेच्याही पलिकडे जाणारे पहिले मानव निर्मित वस्तू आहे. विश्वाच्या अथांग पसाऱ्यात आपल्या सौर्यमालेच्या पलिकडे कोणते ग्रह आहेत का याचा शोध घेण्यासाठी ते अंतराळात सोडले होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.