पालिकेचे फेर प्रभाग रचना करा निवडणूक आयोगाचे आदेश!
————————————–
पुणे पुणे महानगरपालिकेमध्ये तीन नगरसेवकांचा एक प्रभागांनुसार रचना पुर्वी करण्यात आली होती. तर मागील निवडणुका भाजपा सरकार कालावधीत चार नगरसेवक प्रत्येक प्रभागात रचनेनुसार घेण्यात आल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने तयारी चालू केली आहे.येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने निवडणूक आयोगाने प्रभागांच्या फेररचना करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेमध्ये तीनच्या नगरसेवकांच्या प्रभागांनुसार रचना करण्यात आली होती. तर मागील निवडणुका भाजपाच्या सरकारच्या कालावधीमध्ये चारच्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याने राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना कशा होणार याबाबत आता उत्सुकता इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.