माजी आमदार श्रीमती श्रद्धा टापरे यांचे दुःखद निधन!
***बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील माजी आमदार श्रीमती श्रद्धा प्रभाकर टापरे यांचे आज वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
श्रीमती श्रद्धा टापरे ह्या जलंब विधानसभा (आताचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ) मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.
ज्यावेळी त्या आमदार होत्या त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातील आदिवासींच्या धर्मांतराबद्दल मी वृत्तपत्रातून मालिका चालविली होती.
त्यावेळी हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गाजला. श्रीमती श्रद्धा टापरे यांच्या मतदारसंघातील हा प्रश्न असल्याने त्यांच्यावर त्यावेळी बरीच टीका झाली. परंतु याचा त्यांनी कधीही वैयक्तिक संबंधांमध्ये परिणाम दिसू दिला नाही. अत्यंत मृदू स्वभावाच्या आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या दांडगा जनसंपर्क असलेल्या त्या नेत्या होत्या.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती! शांती!! शांती!!!