ताज्या घडामोडी

जयंत मसने यांची पुन्हा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. 

AB7

अकोला

कुशल संघटक, सामाजिक शैक्षणिक आरोग्य, सोबत मानवताचं काम कार्यामध्ये सामाजिक उपक्रमासाठी सदैव तत्पर राहणारे माजी नगरसेवक जयंत मसने, यांच्याकडे अकोला जिल्हा महानगर भाजपाची अध्यक्षपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेश सरचिटणीस स आमदार रणधीर सावरकर यांनी सोपवली.

भारतीय जनता पक्षाला संघटनात्मक वर देणारे व ग्रामीण व शहरी भागामध्ये पक्षाचा विस्तार करणारे व सर्वांना सोबत घेऊन सरळ आणि शांत स्वभावाने पक्षाची भूमिका सर्व दूर पोहोचवणारे जयंत मसने यांची पुन्हा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.


त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय माझी मंत्री संजय भाऊ धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश भाऊसाहेब फुंडकर, आमदार प्रकाश भारताकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल तेजराव थोरात संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर यांना दिले असून पक्षाची जबाबदारी आपण यशस्वीरित्या करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाला यश मिळून देऊ पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचा सर्वदूर सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने अकोला शहर सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू अशी अभिवचन दिली.

भाजपाने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागाची धुरा ओबीसी समाजाकडे सोपवली आहे ओबीसी समाजातील महत्त्वाचे घटक माळी समाज आणि कुणबी समाज यांना महत्वपूर्ण जबाबदारी देऊन संघटना विस्ताराचा संकल्प केला आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.