सद्गुरु मोतीराम बाबा यांचे आचरण केल्यास नामस्मरणाद्वारे ईश्वर प्राप्ती..!सकल संत विचार प्रचारक प्रमोदजी महाराज पांडे
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
सद्गुरु मोतीराम बाबा यांचे आचरण केल्यास नामस्मरणाद्वारे ईश्वर प्राप्ती..!सकल संत विचार प्रचारक प्रमोदजी महाराज पांडे
अकोला: वीर भगतसिंग नगर वटेश्वर मारुती मंदिर येथे श्री संत सद्गुरु मोतीराम बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली व त्यानिमित्त ज्ञानेश्वरी प्रवचन व काल्याचे किर्तन ठेवण्यात आले होते.
सकाळी ४ ते ६ ज्ञानोपदेश जागृती घट पूजन विना पूजन ३. ते ६ ह भ प यादगिरी महाराज ज्ञानेश्वरी प्रवचन व काल्याचे किर्तन सकल संत विचार प्रचारक प्रमोद जी महाराज पांडे यांनी आपल्या काल्याचे कीर्तनातून सद्गुरु मोतीराम बाबाचे संपूर्ण भुगाव पंढरपूर ते सावरबंद जीवन चरित्र सांगितले व संसारातून ईश्वर प्राप्ती कशी केली त्यांनी ईश्वर प्राप्ती करता आचरण केले ते आचरण संसारी पुरुषांनी आपल्या जीवनात उतरवले तर नामस्मरण आधारे ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असे प्रबोधन पर बोलले व कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रुप बांधव गुरु बहिणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सद्गुरु मोतीराम बाबा भक्त मंडळी यांनी केले होते.