पोलिस ठाण्यांच्या आवारातील वाहनांचा होणार लिलाव!
अकोला : पोलिस ठाण्यांच्या आवारातमागील अनेक वर्षांपासून चारचाकी, दुचाकी वाहने धूळ खात पडून आहेत. पोलिस प्रशासनाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू केली असून, नोंद नसलेल्या किंवा अपघातग्रस्त ५१० वाहनांपैकी वाहनधारकांचा ३२ शोध घेण्यात आली आहे. यादरम्यान, उर्वरित वाहनांच्या मूळ मालकांनी संपर्क साधण्यासाठी पोलिस प्रशासनाने ९ मेपर्यंत मुदत दिली होती.जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांच्या आवारात विविध गुन्हेगारी व अपघाती प्रकरणांतून जप्त करण्यात आलेल्यावाहनांचा अक्षरशः खच साचला आहे. या वाहनांमध्ये ४१० नोंद नसलेली आणि १०० अपघातग्रस्त वाहने आहेत. या सर्व वाहनांची मूळ मालकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. पोलिस ठाण्यांच्या आवारातील ही वाहने न्यायालयीन प्रक्रिया संपेपर्यंत तशीच पडून राहतात. अनेकदा मालक पुढाकार घेत नाहीत किंवा ओळख पटवण्यास अपयशी ठरतात. परिणामी, पोलिस ठाण्यांमध्ये जागेचा व कागदोपत्री व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. यादरम्यान, एप्रिल महिन्यात जप्त केलेल्या वाहनांची माहिती पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाहनमालकांनी५१० वाहनांपैकी ३२ वाहनधारकांचा शोध घेण्यात आलाएआय emailwww.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित वाहनाची तपासणी करावी. वाहनाची ओळख पटल्यास मूळ कागदपत्रांसह संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.आरटीओ, शोरूम संचालकांची मदतनोंद नसलेल्या वाहनांच्या मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रादेशिक परिवहन विभाग, वाहन विक्रेता, शोरूम संचालकांसह इतरही यंत्रणांची मदत घेतली. यातूनच ३२ वाहनधारकांचा शोध लागल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.शोध घेतला; रेकॉर्ड नाही!चोरीच्या गुन्ह्यात किंवा अपघातात आढळून आलेल्या वाहनांचे दस्तऐवज शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, यातील बहुतांश वाहनांचे रेकॉर्ड आढळून आले नसल्याची माहिती आहे.त्यामुळे अशा वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला. यातूनच ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचा पर्याय समोर आला.