ताज्या घडामोडी

भारतीय सेनादलाचा व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त

AB7

 

भारतीय सेनादलाचा व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त

अकोला भारतीय सेनादलाचा व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करून पहेलगाम हमल्यातील शहिदांचा बदला घेतल्याबद्दल व 140 कोटी जनतेच्या भावना पूर्ण केल्याबद्दल तमाम विदर्भवास यांच्यावतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी पक्षाच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद दिले.

पहेलगाम इथे धर्म विचारून 28 जणांची हत्या करण्यात आली, व महिलांनी सांगितल्यावर मोदी को जाके बताओ असं सांगितलं होतं 15 दिवसात फक्त सहा मे रोजी रात्री एक वाजून 28 मिनिटांनी नऊ ठिकाणी पाकिस्तान मध्ये नागरिकांना त्रास न देता आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हमला करून राफेल दवारा योग्य ती कारवाई सेनेच्या तिन्ही दलाने संयुक्तरीत्या केली देशाचे पंतप्रधान पहिल्या दिवसापासून व गृहमंत्री अमित शहा रक्षा मंत्री राजनाथ सिंग सातत्याने उत्तर देण्यात येईल आणि यासाठी पंधरा दिवसात सर्व पक्षाची नागरिकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा करून मंगळवारच्या दिवशी उत्तर देऊन आपल्या हद्दीमध्ये राहून शंभर पेक्षा जास्त आतंकवाद्यांना ठार केले व त्यांच्या इमारती नष्ट केल्या हा सेनेचा शौर्य, पंतप्रधानाची दूरदृष्टी व सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त पूर्ण केल्याबद्दल आणि भारताच्या पाठीशी जगभरातील सर्व राष्ट्र पाठीशी उभे राहिले ही भारतीय जनतेची विजय असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाने आज ऑनलाईन बैठक घेऊ सेनेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन आता ठराव करून 140 कोटी जनतेच्या भावना पूर्ण केल्याबद्दल सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन संकटकाळी संपूर्ण देश एकरूप राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील, जयंत मसने विजय अग्रवाल सहित सर्व तालुका मंडळ पदाधिकारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख बूथ समिती चे सर्व पदाधिकारी विविध आघाड्याचे पदाधिकारी या बैठकीत होते अशी माहिती माधव मानकर गिरीश जोशी यांनी दिली.

पाकिस्तान वर केलेल्या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देऊन सिंदूर च महत्व तसेच सनातन धर्माची परंपरा तसेच राफेलवर टीका करणाऱ्यांना उत्तर देऊन सरकारने सर्वसामान्यांचा सन्मान केला व सेनेचा खुलीच सूट देऊन पंतप्रधानाने या ऑपरेशनचा स्वतः नियंत्रणामध्ये पाहणी करून यशस्वीपणे केल्याबद्दल पंतप्रधान आणि सेनेचा गौरव केला

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.