विधानसभेपूर्वी राणेंची मोठी खेळी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ!
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी आता अवघे पाच ते सहा दिवस बाकी आहेत. प्रचारानं देखील जोर पकडला आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.ऐन विधानसा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे .ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केलाय. नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचं कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली आहे.