गोडाऊनमधील स्टॉक कमी असल्याचे लक्षात येताच गुन्ह्याचा तपास सुरू
अकोला स्थानिक. २६ मार्च २०२५ यश संजय अग्रवा दि. २६ मार्च २०२५ रोजी, व्यापारी यश संजय अग्रवाल (रा. राधे नगर, अकोला) यांनी त्यांच्या गोडाऊनची पाहणी केली असता, स्टॉकमध्ये कमतरता असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्टॉक तपासणी केली असता ०१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२५ या कालावधीत ६ नग LG १.५ टन ३ स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी, १ नग LG ५ स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी, तसेच २०१ आणि १८५ लिटर क्षमतेचे २ फ्रिज असा एकूण ३,७०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले.