ताज्या घडामोडी

पंचायत समिती मधील पे पार्किंग बंद करा

AB7

पंचायत समिती मधील पे पार्किंग बंद करा

 

अकोला पंचायत समिती कार्यालय आवारात काही दिवसापासून पे पार्किंग सुरू करण्यात आले असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडी यांचे निदर्शनास येताच युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी अप्पर जिल्हा परिषद सीईओ यांची भेट घेत पार्किंगची कल्पना करून दिली.

सर्व सामान्य नागरीका कडून पार्किंग शुल्क 05 रू ते 25 रू. पर्यंत आकारले जात आहे,

पंचायत समिती कार्यालयात सर्व कार्यालय हे सार्वजनिक कार्यालये आहेत, घरकुल विभाग, पंचायत विभाग, ग्रामसेवक यांच्या भेटीकरिता व आपली समस्या अथवा माहिती घेण्याकरिता येत असतात, जर नागरिकांच्या हक्काचे सार्वजनिक कार्यालय असताना येथील गटविकास अधिकारी तेवढ्यासाठी 10 रुपये सर्वसामान्यनागरिकाकडून पार्किंग चे पैसे उकळताना दिसत आहेत

 

या विषयी पार्किंग शुल्क कोणत्या आधारावर घेत आहात.

पे पार्किंग चे आदेश आहेत का असेल तर आदेशची प्रत , हा पार्किंगचा ठेका कोणत्या कंत्राटदाराला व कोणत्या आधारावर दिला? याचा जाब सी ई ओ यांना युवा आघाडीच्या पदाधिकारी यांनी विचारला जर यावरही पे पार्किंग बंद करण्यात आली नाही तर वंचित बहुजन युवक आघाडी अकोला तालुक्याच्या वतीने ही पार्किंग बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर. प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ रोशन डोंगरे भूषण वानखडे योगेश तायडे स्वप्निल सोळंके नागेश उमाळे विजय वानखडे सोनू सोळंके अक्षय गवई वैभव उमाळे यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.