ताज्या घडामोडी

निवासी उपजिल्हाधिकारी साहेब …. घालू नका वाद, साधा संवाद!तक्रारकर्त्यांचे मत घ्या जाणून, तुमचे मत नका टाकू लानून

AB7

संग्रहित

निवासी उपजिल्हाधिकारी साहेब …. घालू नका वाद, साधा संवाद!तक्रारकर्त्यांचे मत घ्या जाणून, तुमचे मत नका टाकू लानून

 

 

वाशिम जिल्हावासियांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याची जबाबदारी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिका-यांची असते. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्याकडे गेलेल्या तक्रारदारांचे ते ऐकून न घेता आपलेच मत त्यांच्यावर लादत असल्याचे काही घटनांवरून दिसून आले आहे. तथापि, निवासी उपजिल्हाधिकारी साहेब तक्रारकर्त्याशी घालू नका वाद, तक्रारकर्त्याचे म्हणणे घ्या ऐकून, साधा संवाद! असे म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे.

 

झाले असे की, शुक्रवारी शिक्षण बचाव समन्वय समितीचे काही पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी असलेल्या विश्वनाथ घुगे यांच्या दालनात ते निवेदन देण्यास्थठी गेले. साहेवांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर साहेब आपल्या निवेदनातील मुद्दे वाचतील आणि निवेदन स्विकारून

 

मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील, अशी निवेदनकत्यांची अपेक्षा होती. मात्र, घुगे साहेबांनी निवेदनकर्त्यांना सुरुवातीला तुमचे म्हणणे मांडा, असे सांगितले. निवेदनकर्त्यांचे एक प्रतिनिधी निवेदनातील मुद्यांवर आपले मत मांडत असताना त्यांना मध्येच थांबवून आपले मत निवेदनकत्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. मी म्हणतो तेच ऐका अशा अविर्भावात त्यांनी निवेदन कर्त्यांवर

 

आपले मत थोपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी आहे. ० ते २० पटाच्या आतील जिल्हा परिषद शाळा बंद होतीलच, तुम्ही स्पर्धेत टिकण्याची तयारी ठेवा, उठ सूट कशाला येता अशी निवेदने घेऊन।

 

जणू काही एखादा हुकुमशहा, आपल्या समोरील गुलाम जनतेला आदेश देत असावा, अश्या अविर्भावात उद्धट आणि अर्वाच्य भाषेत ते निवेदनकर्त्यांशी बोलत होते. साहेब, आपण जनतेचे लोकसेक्क आहोत, जनतेच्या टॅक्सच्या पैशातूनच आपला पगार होतो, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपली आहे. याची सुतभर जाणीव सुद्धा त्यांना नसावी. हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. त्यांच्या अशा उर्मट वागणुकीनंतरही निवेदनकर्त्यांनी त्यांना साहेब आमचे म्हणणे ऐकून घ्या, नसेल ऐकायचे तर शांतपणे आमचे निवेदन स्विकारा आणि मुख्यमंत्री साहेबांना पाठवून द्या. अशी विनंती निवेदनकर्ते करत होते. मात्र,

 

खुर्चीची मयुरी चढलेल्या साहेबांनी बाहेर उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना आत बोलावले आणि यांना बाहेर हाकलून द्या, असे आदेशित केले. त्यांच्या अशा विक्षिप्त वागणुकीची संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा रंगली होती. यावेळी बिनाकारण बाद नको म्हणून निवेदनकर्ते त्यांच्या दालनातून बाहेर आले.

 

एका लोकसेवकाने लोकांसोबत केलेला दुर्रव्यवहार शासनाच्या कुठल्याच नियमात बसत नसल्यामुळे वैचारिक बांधणी असलेल्या निवेदनकत्यांनी

 

निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांचे वरिष्ठ असलेल्या जिल्हाधिकारी, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, राज्यपाल तसेच मुख्यमंत्री आदीना लिखित स्वरूपात तक्रार देऊन निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांच्या गैरवर्तनाबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मागितले, निवासी उपजिल्हाधिकारी पुगे यांनी यापूर्वीही तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांसोबत अशाच प्रकारे गैरवर्तन

 

निवासी उपजिल्हाधिकारी

 

विश्वनाथ घुगे यांचा उद्धटपणा

 

शिक्षण बचाव समन्दय समितीचे पदाधिकारी निवेदन देण्या साठी गेले असता निवेदनकर्त्यासोबत मुद्देसूद चर्चा न करता मी मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे. ० ते २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद होतीलव, स्पर्धेत टिकणे हे तुमचे काम आहे, अशा वेगवेगळ्या मुद्‌द्यांवर उद्धट वागणूक देऊन कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप निवेदनकाचांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे प्रधान सचिव तसेच जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी

 

केल्याची चर्चा आहे. म्हणूनच की काय स्थानिक पत्रकार बांधवांच्या एका समाज माध्यमावर घुगे यांच्या विविध कारनाम्यांची चर्चा रंगली होती. एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी पत्रकार बांधव त्यांच्याकडे गेल्यानंतर पत्रकारांसोबतही त्यांनी मुक्त संवादाची शैली न वापरल्याची चर्चा आहे. मुळात जिल्हाधिकारी यांच्याकडे महत्वाचे विषय हाताळले जात असल्यामुळे एखादी तक्रार किंवा निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्याबाबत संबंधित विभागाला आदेशित करण्याचे काम आरडीसी अर्थातच निवासी उपजिल्हाधिका-यांकडे असते. यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत राहिलेल्या कुठल्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत अशाप्रकारे गैरवर्तन केल्याचा प्रकार शोधूनही

 

केली आहे. उपजिल्हाधिकारी हे नागरिकांसह पत्रकारांसोबतही संवाद साधत नसल्याचे सोशलमिडीयावर चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांसह पत्रकारांसोबतही समन्वयाने वागावे अशी मागणी होत आहे.

 

जिल्हाधिकारी तथा विभागीय पातळीवरील अधिकारी याबाबत काय तो निर्णय घेतीलच. मात्र, घुगे साहेबांना एकच सांगावेसे वाटते, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे साहेब, सामान्य नागरिकांशी कशाला घालता विनाकारण वाद, त्यांचे ऐकून घ्या आणि सामंजस्याने साधा संबाद।

 

सापडणार नाही. असे असताना घुगे यांच्याबाबतच अशा प्रकारच्या तक्रारी का येत असाव्यात, यावर चिंतन करण्याची वेळ त्यांच्या वरिष्ठांवर आली आहे. नाही.

 

असले प्रकार यापुढे होणार नाहीत याची काळजी पुगे साहेब नक्कीच घेतील, अशी अपेक्षा करायला काही हरकत

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.