ताज्या घडामोडी

कोराडी वसाहतीत बिबट्याचा धुडगूस संपवून भयमुक्त वातावरण; सुरक्षा टीमचा नागरिकांकडून सन्मान!*

AB7

कोराडी वसाहतीत बिबट्याचा धुडगूस संपवून भयमुक्त वातावरण; सुरक्षा टीमचा नागरिकांकडून सन्मान!

कोराडी : कोराडी वसाहती परिसरात घडलेल्या बिबट्याच्या शिरकावाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या परिस्थितीत मा. श्री देवेंद्रजी राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा यांच्या कुशल नेतृत्व खाली श्री पी.पी. उमरकर, उप व्यवस्थापक सुरक्षा व त्यांच्या टीमने अतिशय शिताफीने आणि सुरक्षित पद्धतीने बिबट्याला जेरबंद केले. ही धाडसी कारवाई केवळ वसाहतीतील नागरिकांचे जीवन व संपत्तीचे रक्षण करणारीच नव्हे, तर परिसर भयमुक्त करणारी ठरली. यानिमित्ताने, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नागरिकांनी मनोरंजन केंद्र क्रमांक दोन वतीने श्री देवेंद्रजी राठोड साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार समारंभ आयोजित केला. सत्कार सोहळ्यात नागरिकांनी या टीमच्या परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे. “सुरक्षा टीमच्या वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आज वसाहतीतील वातावरण भयमुक्त झाले आहे,” असे नागरिकांनी यावेळी सांगितले. सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेल्या या घटनेने सुरक्षा विभागाचा गौरव वाढला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.