दहिहंडा रोडवर बस फेरी वाढवण्याकरिता विद्यार्थ्यांनी दिले निवेदन बस ची दु. ३.३० वा. ची वेळ सांयकाळी ५.३० ला नियमित व वेळेवर सोडण्याची मागणी
AB7
दहिहंडा रोडवर बस फेरी वाढवण्याकरिता विद्यार्थ्यांनी दिले निवेदन
बस ची दु. ३.३० वा. ची वेळ सांयकाळी ५.३० ला नियमित व वेळेवर सोडण्याची मागणी
अकोला : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचा बस उशिरा पोहचुन देते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समोर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. दि 27/01/2025 रोजी व्यवस्थापक साहेब, आगार क्र.१ जुने बस स्थातक, यांना अकोला, दहिहांडा, दर्यापूर मार्गे शिकत असलेले विद्यार्थी अकोला, दहिहांडा दर्यापूर एस.टी. विद्यार्थ्याच्या सोई नुसार सोडण्यात येणे बाबत. निवेदन देण्यात आले निवेदन सादर करताना उपस्थित विद्यार्थी: गौरव चेचरे, शुभम खोडके कोमल अंकुरकार अकोला दहीहांडा रोड वरील विद्यार्थी व नागरिक अकोला दर्यापूर रोडवर असलेलं दहीहंडा येथे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता दर्यापूर ते कधी अकोला बस येण्या-जाण्यासाठी एक एक दोन दोन तास वाट पाहत बसावे लागते तर कधी गाडीच येत नाही असे विद्यार्थ्यांचे आरोप आहेत विध्यार्थी म्हणतात आम्ही दोन दोन तास इथे बसतो गाडीची वाट बघतो बस येत नाही
अकोला, दहिहांडा, दर्यापूर मार्गे जाणारी बस नियमित वेळेनुसार लागत नाही. या कारणास्तव विद्यार्थ्यांना या समस्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शैक्षणिक नियमानुसार शाळेची घरी जाण्याची वेळ ५ वाजताची ठरलेली आहे. परंतु या मार्गे जाणारी बस ची वेळ १.३० वाजता व त्यानंतर दुपारी ३.३० वाजता उशिरा तर कधी लागत पण नाही. या परिणाम स्वरुप विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिक्षण व अभ्यासाकरीता बाधा निर्माण होत आहे. अकोला दहिहांडा दर्यापूर मार्गे जाणारे अनेक विद्यार्थी आहेत. जसे कुणी पोलीस भर्ती, सरळ सेवा, तलाठी, एम.पी.एस.सी. अश्या किती तरी स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की, या मध्ये सर्वांत जास्त मुलीचे प्रमाण असुन त्यांना याचा सर्वांत जास्त त्रास सहन करावा लागत आहे. कारण शेवटची बस दुपारी ३.३० नंतर सरळ सांयकाळी ७.०० वाजता लागते आणी विद्यार्थ्यांचा उशिरा पर्यंत पोहचुन देते. यामुळे पालकांच्या समोर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांची हि मागणी आहे की. बस ची वेळ सांयकाळी ५.३० ला नियमित व वेळेनुसार लावावी. जेणे करुन समस्त विद्यार्थाच्या समस्या दुर होतील अशी अपेक्षा आहे.