दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जनआक्रोशबसस्थानक चौकात निषेध करत पुतळा दहन
अकोला : काश्मीरमधील पहलगाम येथनुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांचा बळी गेल्याने अकोल्यात तीव्र संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जन सत्याग्रह संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील बस स्थानक चौकात निषेध करण्यात आला. यावेळी दहशतवादाचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात आला.
‘दहशतवाद मुर्दाबाद’, ‘शहिदांना न्याय मिळावा’, ‘आरोपींना कठोर शिक्षा द्या’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांनी सरकारकडे मागणी केली की, शहिदांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जावी आणि एका सदस्याला शासकीय नोकरीची संधी मिळावी.
घटनेच्या चौकशीची मागणी
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, इतक्या संवेदनशील भागात दहशतवादी सहजतेने घुसून २६ नागरिकांचा जीव घेतात, तरी एकही दहशतवादी पकडला जात नाही, ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी कुणाची आहे? या घटनेची चौकशी तातडीने व्हावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केले. त्यांच्यासोबत फिरोज खान, जावेद पठाण, हाफिज नाझिम, मोहम्मद रिझवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.