युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला : अकोट फैल पोलिस स्टेशनहद्दीतील अकोला-अकोट मार्गावरील उगवा फाटा येथे एका झाडाला १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २ मे रोजी उघडकीस आली. संकेत मुरलीधर राऊत (१८, रा. उगवा, अकोला) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांनी उगवा फाटा गाठत पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. सदर युवकाने आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करीत आहेत.