राजकीय

‘व्होट जिहाद’साठी देशभरातून 125 कोटी, मालेगावात गुन्हा दाखल, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

ग्रामीण भागातील सहकारी बँकेत हे अकाऊंट उघडले जातात. तसेच ज्या नावाने बँक अकाऊंट उघडले ते सर्व खाती हिंदू व्यक्तींच्या नावाने आहेत. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला होता.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात ‘व्होट जिहाद’ कामाला लागली आहे. या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयाचे व्यवहार झाल्याचे मालेगाव येथे बाहेर आले आहे. देशभरातून विविध बँक खात्यातून मालेगावच्या बँकेत पैसे जमा झाले. 125 कोटीहून अधिक पैसे जमा झाले आहे. या प्रकरणी मालेगाव येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज अहमद फरार झाला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगितले.

किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई, नाशिक, अहमदाबाद 37 अकाऊंटमध्ये पैसे पाठवून त्यानंतर ते काढण्यात आले आहे. सुमारे सव्वाशे कोटी रुपये व्होट जिहादमध्ये वापरण्यात येत आहेत. मी या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. तसेच सीबीआय आणि ईडीने ताबडतोब कारवाई सुरू करावी, अशी आपली मागणी आहे.

देशातील बँकांमध्ये जमा झाला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे. 100 कोटी रुपये बाहेरून आला आहे. हा पैसा विदेशातून आल्याची मला शंका आहे, असे सोमय्या यांनी म्हटले. ते म्हणाले, अवघ्या तीन दिवसात बँकेत कुठून पैसा जमा झाले ते कळले पाहिजे. हे पैसे कुठून आले पैसे आणि कुठे गेले हे कळले पाहिजे. ग्रामीण भागातील सहकारी बँकेत हे अकाऊंट उघडले जातात. तसेच ज्या नावाने बँक अकाऊंट उघडले ते सर्व खाती हिंदू व्यक्तींच्या नावाने आहेत. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते

सामना वर्तमानपत्रावर आपण गुन्हा  दाखल करणार आहोत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. सामना वृत्तपत्रातून पुन्हा माझ्या कुटुंबाची बदनामी सुरू आहे. आज पुन्हा एकदा वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. जुहूमध्ये मालमत्ता हडप करत असल्याचा त्यांनी सामनामधून सांगितले आहे. कोर्टात शिक्षा झाल्यानंतर अजूनही संजय राऊत यांनी धडा घेतलेला नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.