ताज्या घडामोडी

अमरावती मार्गावर चारचाकीला अपघात१८ लोककलावंत जखमी; एक गंभीर

AB7

१८ लोककलावंत जखमी; एक गंभीर परतवाडा-अमरावती मार्गावर चारचाकीला अपघात

 

परतवाडा : अमरावती येथील विमानतळ उद्घाटनप्रसंगी आदिवासी लोकनृत्य सादर करण्यासाठी धारणी येथून निघालेल्या वाहनाला परतवाडा-अमरावती मार्गात मेघनाथपूरजवळ बुधवारी पहाटे ५ वाजता अपघात झाला. अपघातात १८ जण जखमी झाले. यापैकी तिलक कासदेकर (१२) याला अमरावती येथे दाखल करण्यात आले.दीपक कासदेकर (१७), मौजीलाल पाटणकर (६५), स्वास्तिका कासदेकर (१७), भारती मावसकर (१७), संगीता कासदेकर (१८), नंदलाल धांडे (६०), मंगल कासदेकर (६०), काशीराम जांभेकर (५०), कालू मावसकर (५०), बेबू मावसकर (५५), विशाल पाटील (२१), संजय जावरकर (१८), गोविंद जावरकर (४५) राज मावसकर (५५, सर्व राहणार बेरदाबल्डा) व चालक संदीप भिलावेकर (२५, रा. राणा मालूर) अशी अन्य जखमींची नावे आहेत. सरमसपुरा पोलिसांनी चालक संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.चालकाला रात्रभर वाहन चालवून झोपेची डुलकी आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासअचलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले जखमी.झाडाला धडकले वाहनविमानतळाच्या उ‌द्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येणार असल्याने धारणी येथून बेरदाबल्डा येथील आदिवासी चारचाकी वाहनाने निघाले होते. बोरगाव दोरी ते मेघनाथपूर फाट्यावर ते वाहन झाडावर आदळले. अपघाताच्या परिणामी वाहनाचे एक्सेल तुटले.तोंडी सूचनेवर निघाले आदिवासीविमानतळ उद्घाटनासाठी कोरकू आदिवासींचे पारंपरिक गादुली नृत्य सादर करण्यासाठी पथक बेरदाबल्डा येथून निघाले होते. तहसीलमधून तोंडी सूचना मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीच ते वाहनाने निघाल्याची माहिती गानूजी सावरकर यांनी लोकमतला दिली.66जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.