ताज्या घडामोडी

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अकोला विमानतळाचे काम रखडले आ. साजिद खान पठाण यांचा घणाघाती आरोप

AB7

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अकोला विमानतळाचे काम रखडले

आ. साजिद खान पठाण यांचा घणाघाती आरोप

अकोला : मंगळवारी अमरावती विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले असून अमरावती ते मुंबई उड्डाण सेवा सुरू करण्यात आली. अकोल्याच्या विमानतळ स्थापनेच्या ५० वर्षांनंतर अमरावती विमानतळ बांधण्यात आले तरी मात्र अकोल्याच्या आधी अमरावती विमानतळ सुरू करण्यात आल्याने हे अकोल्यातील स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींचे अपयश असून त्यांच्या उदासीन धोरणाने अकोला विमानतळाचे काम रखडले असल्याचा घणाघाती आरोप आ. साजिद खान पठाण यांनी केला. पुढे बोलताना आ. पठाण म्हणाले की, अकोला विमानतळाचे बांधकाम हे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९४३ मध्ये झाले आहे. तर उलट अमरावती विमानतळाचे बांधकाम हे १९९२ मध्ये झाले आहे. म्हणजेच अकोल्याच्या ५० वर्षानंतर अमरावती विमानतळाचे बांधकाम झाले आहे. तर दुसरीकडे अकोल्यात गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहे. विमानतळाचा आढावा घेतला असता अमरावती पूर्वी अकोल्यात जमीन अधिग्रहण आणि लागणाऱ्या विविध तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन अकोला विमानतळ सुरू होणे अपेक्षित होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणांमुळे अकोला विमानतळाचे काम रखडले आहे. तर अकोल्या पाठोपाठ निर्मिती झालेल्या झालेल्या अमरावती विमानतळाचे आज मंगळवारी उद्घाटन सुद्धा झाले तर आता अमरावती विमानतळाहून अमरावती ते मुंबई हवाईसेवा सुद्धा सुरू करण्यात आली. विमानतळ सुरू करण्यासाठी अमरावतीच्या लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा हा कौतुकास्पद आहे. म्हणून आज त्याचेच फलित म्हणून अमरावती विमानतळ कार्यान्वित झाले आहे. तर दुसरीकडे एअरपोर्ट अथॉरिटी च्या विविध नॉर्म्स मुळे आता अकोला विमानतळाहून फ्लाईट टेकओव्हर करणार की नाही याबाबत साशंकता आहे. तरी आगामी काळात अकोला विमानतळ सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची माहिती आ. साजिद खान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.