ताज्या घडामोडी

 मंडळ व तलाठी कार्यालयांतही होणार ई- ऑफिस कार्यान्वित पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीला सुरुवातअकोला जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

AB7

मंडळ व तलाठी कार्यालयांतही होणार ई- ऑफिस कार्यान्वित पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीला सुरुवातअकोला जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

अकोला, दि. १३ : जिल्ह्यातील उपविभागीय, तसेच तहसील कार्यालयांपाठोपाठ आता मंडळ व तलाठी कार्यालयांतही ई- ऑफिस कार्यान्वित करण्यासाठी महत्वाचे पाऊल अकोला जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. कामकाजात गतिमानता, अचूकता, पारदर्शकता आणण्यासाठी व नागरिकांना जलद सेवा मिळण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होणार आहे. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला अद्ययावत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी असा सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील विविध कार्यालयांत ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या उपक्रमाची सुरूवात झाली, तसेच उपविभागीय कार्यालये आणि तहसील कार्यालयांतही ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर आता जिल्ह्यातील मंडळ कार्यालये व तलाठी कार्यालयांतही ई-ऑफिस अंमलात आणण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. त्याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात दहा मंडळ कार्यालये व 50 तलाठी कार्यालयांत ई- ऑफिस कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी व तलाठी यांचे ऑनलाइन प्रशिक्षण आज झाले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या मार्गदर्शनात ‘महाआयटी’चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना ई-ऑफिसच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले. ई- ऑफिससाठी आवश्यक असलेले शासकीय ई मेल आयडी नुकतेच राष्ट्रीय सूचना केंद्रांकडून प्राप्त करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांना ई- ऑफिसद्वारे कामकाज चालविणे शक्य होणार आहे.ई- ऑफिसचे लाभकार्यक्षमता व परिणामकारकता वाढते, कागदविरहिकार्यालय,पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होते, कामकाजातील विलंब कमी होतो,निष्पक्ष आणि पारदर्शक कर्मचारी मूल्यमापन होते नागरिकांना सुलभ प्रक्रिया व जलद प्रतिसाद मिळतोप्रशासनाला त्वरित निर्णय घेण्यास मदत होतेडेटा सुरक्षितता आणि डेटा अखंडितता निर्माण होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.