ताज्या घडामोडी

अमरावती विमानतळ उद्घाटन समारंभाच्या बहिष्काराचे आवाहन

AB7 ज्ञानेश्वर निखाडे

अमरावती विमानतळ उद्घाटन समारंभाच्या बहिष्काराचे आवाहन

अकोला जिल्ह्यातील जनता अनेक वर्षांपासून आपल्या भागात विमानतळ उभारण्याची मागणी करत आहे, परंतु ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या अकोला सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला आजही विमानसेवेपासून वंचित ठेवले गेले आहे, तर दुसरीकडे जवळच असलेल्या अमरावतीमध्ये विमानतळाचे उद्घाटन होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि जाकरिया फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना – खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर जनप्रतिनिधींना – दिनांक १६ एप्रिल रोजी अमरावती येथे होणाऱ्या विमानतळ उद्घाटन समारंभाचा पूर्ण बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे.
अकोला जिल्ह्याच्या दुर्लक्षिततेविरुद्धचा हा बहिष्कार एक शांततामय पण प्रभावी संदेश ठरेल. अकोल्याच्या जनतेला हे जाणवून देणे अत्यंत गरजेचे आहे की, त्यांचे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या अधिकारांसाठी आणि सन्मानासाठी ठामपणे उभे आहेत. अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणे म्हणजे अकोल्याच्या दीर्घकालीन मागणीचा अपमान करण्यासारखे आहे.
म्हणूनच, हा एक नैतिक आणि जनहिताचा मुद्दा आहे की अकोला जिल्ह्यातील कोणताही लोकप्रतिनिधी या उद्घाटन समारंभात सहभागी होऊ नये. हा पाऊल अकोल्याच्या लोकशाही हक्कांच्या रक्षणासाठी एक ठोस आणि निर्णायक आवाज ठरेल.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.