ताज्या घडामोडी

. ३१ मार्च २०२५ रोजी पुणे येथे’ अखिल भारतीय गोंधळी संघटना संघटना’ वार्षिक सर्वसाधारण सभेतील महत्त्वपूर्ण निर्णय! 

AB7

 

दि. ३१ मार्च २०२५ रोजी पुणे येथे’ अखिल भारतीय गोंधळी संघटना संघटना’ वार्षिक सर्वसाधारण सभेतील महत्त्वपूर्ण निर्णय!

पुणे ;- पुणे येथे अखिल भारतीय गोंधळी समाजसंघटना वार्षिक सर्वसाधारण सभा एरंडवणा येथील’ गोंधळी सांस्कृतिक भवन’ कार्यालयात संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र अण्णाराव वनारसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून खालील महत्त्वपूर्ण निर्णय अमंलबजावणी करिता घेण्यात आले आहे.

१) अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना संघटना’ सभासद यादी सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीतील तयार करण्यात आली व वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केली असून अद्याप पर्यंत ज्यांनी सभासद नोंदणी पुस्तिका त्यांनी पुणे येथे मध्यवर्ती कार्यालय व्यवस्था प्रमुखांकडे दि.१५एप्रिल २०२५ पर्यंत जमा जमा कराव्यात. त्यामुळे त्यातील सभासद नोंदणी केलेली नावे पुरवणी यादीत समाविष्ट केले जातील .नंतर जमा केले तर त्यांची नावे सभासद यादीत समाविष्ट केले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

२) सन २०२१ ते सन २०२५ पर्यंत कालावधीतील संघटना कार्याचा तपशील आणि अहवाल मा. धर्मदाय आयुक्त-१पुणे यांच्या कडे सादर करणे आवश्यक आहे म्हणून सन २०२४-२५ चा हिशोब मध्यवर्ती कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, जिल्हा व तालुका शाखा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी त्यांच्या कडे देण्यात आलेले सभासद नोंदणी शुल्क व देणगी बुक तसेच केलेल्या जमा खर्चाचा तपशील दि. १५मार्च २०२५ पर्यंत संबंधितांकडे जमा करून पोच घ्यावी. कारण संघटना चे नवीन बॅंक खाते उघडणे आहे आणि सदरील रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

३) सन २०२६ते २०३० या कालावधीसाठी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना मध्यवर्ती कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य निश्चित करण्यासाठी सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी निश्चित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. (पान १ )

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.