राजकीय

लातूर शहर विधानसभा निवडणूकीत कोणाची होणार सरशी ? देशमुख-चाकुरकर घराण्यात टक्कर

लातूर शहर विधानसभा निवडणूकीत यंदा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांच्या होणार आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले अमित देशमुख आपला गड कायम राखतात की गमावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूर शहर विधान सभा मतदार संघातून यंदा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी अमित देशमुख यांनी तीन वेळा विधान सभा निवडणूक जिंकलेली आहे. यावेळी मात्र भाजपाकडून प्रथमच तगडं आव्हान त्यांना देण्यात आलेले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांना भाजपाने तिकीट दिलेले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने विनोद खटके यांना उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे कागदावर तरी ही निवडणूक तिरंगी असली तरी मुख्य लढत देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार असल्याने दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अमित देशमुख यांच्या आधी त्यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख या मतदार संघाचे साल 1980 पासून प्रतिनिधीत्व करीत आलेले आहेत. या ठिकाणी विलासरावांचा वारसा त्यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख यांनी साल 2009 पासून चालविण्यास सुरुवात केली आहे. सलग तीन वेळा अमित देशमुख येथून निवडून आलेले आहेत. भाजपाकडून त्यांना फारसे तोडीचे उमेदवार दिले जात नाहीत अशी येथील मतदारांची धारणा होती. त्यामुळे अमित देशमुख यांचा विजय एकहाती होत असे. त्यांना भाजपाकडून फारसे तगडे आव्हान दिले जात नव्हते. यंदा  माजी कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनेला ( डॉ.अर्चना पाटील ) अमित देशमुख यांच्या विरोधात उभे केले आहे.

डॉ.अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.  साल 2019 पासून अर्चना पाटील निवडणूकीची तयारी करीत आहेत. परंतू कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढविली नव्हती. दुसरीकडे त्यांचे सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपली सून भाजपात गेली असली तरी आपण भाजपात प्रवेश केलेला नाही असे म्हटले आहे.  शिवराज पाटील गेली अनेक वर्षे सक्रीय नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही अमित देशमुख यांच्याकडे वळले असल्याचे म्हटले जात आहे.  अशाच अर्चना पाटील यांची भिस्त सासऱ्यांच्या पुण्याईवर अवलंबून आहे. तर अमित देशमुख यांच्या पाठीशी वडीलांची पूण्याई आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कॉंग्रेसला दलित आणि मुस्लीम मते मिळालेली होती. परंतू यंदा लातूर शहर निवडणूकीत कॉंग्रेसची मते खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो, यावर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे भवितव्य अवलंबून आहे. डॉ. अर्चना पाटील – चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्याने त्यांना लिंगायत समाजाचा पाठींबा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतू अमित देशमुख यांना लिंगायत समाजाची मते मिळण्याची शक्यता अधिक आहे. येथील विलासराव देशमुख यांची पुण्याई अमित देशमुख कामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंगायत आणि मराठा अशा मतांच्या पाठींब्यावर त्यांचा विजय सोपा असल्याचे म्हटले जात आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.