शिरपूर तालुक्यातील वाडी येथील घटना वसुली पथकासमोरच वृध्दाची आत्महत्य या घटनेमध्ये पोलीस कोणता गुन्हा दाखल करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे
AB7
शिरपूर तालुक्यातील वाडी येथील घटना वसुली पथकासमोरच वृध्दाची आत्महत्य या घटनेमध्ये पोलीस कोणता गुन्हा दाखल करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे
शिरपूर : तालुक्यातील वाडी खुर्द येथील शेतकरी हरचंद दगा पाटील (वय ६५) यांनी कर्ज वसुली आणि जप्तीच्या कारवाईसाठी आलेल्या बँकेच्या पथकासमोरच विष घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर जोपर्यंत बँकेच्या संबंधित पथकाविरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी घेतली होती.सायंकाळी प्रातांधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी समजूत घातल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.वाडी येथील शेतकरी हरचंद दगा पाटील यांनी शिरपूर महाराष्ट्र बँकेतून गेल्या ८ वर्षापूर्वी ३ वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घरतारण करून घेतले होते.कर्जाचा बोझा वाढल्यामुळे ते फेडणे शक्य नव्हते. बँकेने यासंदर्भात वारंवार नोटीसा दिल्या होत्या, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने १२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेचे पथक कर्ज जप्ती करण्यासाठी हरचंद दगा पाटील यांच्याकडे गेले.जप्तीची कारवाई सुरू असतानाच हरचंद पाटील यांनी बँकेच्या पथकासमोरच काहीतरी विषारी औषध प्राशन केले.मृतदेह ताब्यात घेण्यास नकारहरचंद पाटील यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेत असताना त्यांच काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर मयत शेतकऱ्याच्या संतप्त नातेवाइकां जोपर्यंत संबंधित जप्ती पथकाविरोधा कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत होती. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत पंचनामा व शवविच्छेदन झालेले नव्हते शेवटी प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर सायंकाळनंतर मृतदेहाचे शवविच्छेन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री उशिरा वाडी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्या यावेळी सांगण्यात आले., या घटनेमध्ये पोलीस कोणता गुन्हा दाखल करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे