दारू पिण्याच्या वादावरून त्याने पत्नीच्या रक्ताने केली ‘होळी’पतीने केला लाठी-काठीने खून, २६ मार्चपर्यंत तुरुंगात, कुटंगा येथील घटना
AB7
दारू पिण्याच्या वादावरून त्याने पत्नीच्या रक्ताने केली ‘होळी’पतीने केला लाठी-काठीने खून, २६ मार्चपर्यंत तुरुंगात, कुटंगा येथील घटना
धारणी : दारू पिण्याच्या वादातूनपती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागाच्याभरात पतीने लाठी-काठीने मर्मांतक वारकेल्याने तिचा मृत्यू झाला. ११ मार्च रोजीमध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.त्याचा उलगडा बुधवारी दुपारी झाला. गुरुवारी पहाटे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. न्यायालयाने आरोपीची २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.पोलिस सूत्रांनुसार, जमुना रतन मुरले (५२) असे मृताचे, तर रतन बाबू मुरले (५५) असे आरोपी पतीचे नाव आहे. धारणीपासून ३५ किलोमीटरवरील कुटंगा गावातील हे दाम्पत्य ११ मार्च रोजी दामजीपुरा मार्गावरील लागवणीने घेतलेल्या शेतात होते. तेथे त्यांचा मुलगा रूपेश (३२) हा पत्नीसह आला होता. रतन व जमुना यांनी सवयीने मद्यपान केले. परंतु, जमुनाने आणखी मद्याची मागणी केल्याने रतनने वाद घातला. सामोपचारानंतर चौघांनी मिळूनमांसाहाराचे सेवन केले. यानंतर रूपेश पत्नीसह गावात परतला. बुधवारी सकाळी रूपेश हा शेतात गेला. त्याने वडिलांना विचारपूस केली तेव्हा आई गावात गेल्याचे सांगितले. रूपेशने गावात शोध घेतला आणि पुन्हा शेतात गेला. मात्र, रतनने जमुना ही गावात गेल्याचाच पुनरुच्चार केला. शोधाशोध घेऊन दमल्याने दुपारी रूपेश निद्राधीन झाला. सायंकाळी त्याला आई जमुनाचे धूड हे कुटंगा ते दामजीपुरा मार्गावरील रस्त्याच्या कडेला पडले असल्याची माहिती मिळाली. तिच्या अंगावर जखमा होत्या आणि शरीरातून रक्त निथळत होते. रतनने त्याला ‘और दारू पियो’ एवढेच उत्तर दिले. वडिलांनी रात्री आईसोबत भांडण उकरून काढत हत्या केल्याची रूपेशच्या एव्हाना लक्षात आले. त्यामुळे त्याने सरपंच व पोलिस पाटलांकरवी धारणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळाचा पंचानामा करून मृतदेह धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. रूपेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून गुरुवारी पहाटे रतनला अटक केली. पुढील तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके करीत आहेत.