ताज्या घडामोडी
नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन – प्रवाशांसाठी सुरु करण्यासाठी महत्त्वाची मागणी, खासदार अनुप धोत्रे यांनी केली !
AB7
📍 संसद भवन l नवी दिल्ली
🚆 नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन – प्रवाशांसाठी सुरु करण्यासाठी महत्त्वाची मागणी, खासदार अनुप धोत्रे यांनी केली !
भारतीय रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा करण्यासाठी अमृत भारत योजना 2.0 अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आज लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी मा. रेल्वे मंत्री यांच्याकडे केली.तसेच अकोला रेल्वे स्थानकासाठी गतिशक्ती टर्मिनल मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.गतिशक्ती टर्मिनलमुळे आधुनिक व तत्पर रेल्वे सेवा उपलब्ध होऊन आर्थिक विकासालाही गती मिळेल. हा दूरदृष्टीचा निर्णय घेतल्या मुळे अकोल्याच्या आणि प्रामुख्याने विदर्भाच्या प्रगतीस हातभार लागेल.