जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई व जीवनात साथ देणारी लक्ष्मी यांचा दररोज सन्मान आवश्यक – नरेश बोरकर
AB7, ज्ञानेश्वर निखाडे
जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई व जीवनात साथ देणारी लक्ष्मी यांचा दररोज सन्मान आवश्यक – नरेश बोरकर
अकोला – जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, व जीवनात साथ देणारी लक्ष्मी यांचा दररोज सन्मान आवश्यक असल्याचे प्रतिपादन नरेश बोरकर यांनी अकोला लॉ कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमात केले.
सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अकोला लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल सौ. सीमा सिरसाट यांनी हारार्पण केले. कार्यक्रमाला प्रमुख म्हणून प्रिन्सिपल सौ. सीमा सिरसाट, संगीता बोंबळे यांच्यासह प्रा.नेहा देशमुख, प्रा.गायत्री पाटील, प्रा. पुनम शुक्ला, प्रा. प्रज्ञा पोहरे, प्रा. नितु ठाकरे, प्रा.दीपिका पितळे, उपस्थित होते. या सर्वांचे जागतिक महिला दिनानिमित्त स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी महिला दिनानिमित्त लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनपाचे माजी कर्तव्यदक्ष अधिकारी नरेश बोरकर यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले की जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, व जीवनात साथ देणारी लक्ष्मी या सर्व रूपात व कार्यात असणारी महीला म्हणूनच महिला दिनी एक दिवस सन्मान करण्याऐवजी दररोज महिला सन्मान व आदर झाला पाहिजे.
यावेळी प्रा. पवन चव्हाण, अमित वाहूरवाघ, अजय भारसाकळे, मनपा चे माजी कर्तव्यदक्ष अधिकारी नरेश बोरकर व अकोला लॉ कॉलेज विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.